Friday, July 15, 2011

TIMEPASS

रस्त्यातून चालताना उगाच नजर वळवून तिच्याकडे बघायचा
तिने पण आपल्याकडे बघावं म्हणून काहीतरी इशारा करायचा
आपण पण मागे वळून वळून बघायचा
आणि आपण पुढच्या खड्ड्यात जावून पडायचा
कशाला हवीत हि नाटकं
त्यापेक्षा आपला आपण टाईमपास केलेला बरा

फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून आधी फ्रेंड बनवायचा
नंतर galfriend बनवायचा प्रयत्न करायचा
ती ऑफलाईन जाईपर्यंत तिच्याशी चाटींग करायची
विषय नसेल काहीतरी उगाच काहीतरी बडबड करायची
कशाला हवीत हि नाटकं
त्यापेक्षा आपला आपण टाईमपास केलेला बरा

मौका बघून चोका मारायचा न तिला propose करायचा
तिचं उत्तर येईपर्यंत Gas वर राहायचा
नाही बोलली तर तिला convince करायचा प्रयत्न करायचा
हो बोलल्यावर उगाच हवेत उडायचा
मित्रांसाठी त्यानिमित्ताने पार्टी चा खर्च करायचा
कशाला हवीत हि नाटकं
त्यापेक्षा आपला आपण टाईमपास केलेला बरा

हो बोलली म्हणून तिला 1st मीटिंग ला काहीतरी गिफ्ट द्यायचं
हॉटेल मधे जावून तो पण खर्च आपणच करायचा
सोबत तिची कोणी फ्रेंड असेल तर उगाच uncomrtable फील करायचा
इच्छा नसताना सुद्धा तिला entertained करायचा
girlfrend ला जळवण्यासाठी तिच्या फ्रेंडला flirt करायचा
कशाला हवीत हि नाटकं
त्यापेक्षा आपला आपण टाईमपास केलेला बरा

ती miss call देणार आणि आपण मुर्खासारखा call करायचा
रात्री उशिरापर्यंत आपलाच balance संपवायचा
खूप शपथा घ्यायच्या
एकमेकांना promise करायचा
कंटाळा आल्यावर तिने म्हणावा घरून permission नाही मिळणार मला विसरून जा
कशाला हवीत हि नाटकं
त्यापेक्षा आपण टाईमपास केलेला बरा...................

Thursday, September 30, 2010

काय सांगु

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
बोलायच खुप असत मला
पण बोलणं मात्र जमत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
दुखवल जात आम्हाला
दुखवता आम्हाला येत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
खोट खोट हसता हसता
रडता मात्र येत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
दुःखात सुख अस समजता
दुःख ही फिरकत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
बरोबर बरेच असतात
पण एकटेपणा काही सोडत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
चार शब्द सांगतो
पण कोणी ऐकतच नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
ज्यांना आम्ही मित्र मानतो
मित्र ते आम्हाला समजतच नाहीत.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
मांडायचा प्रयत्न करतोय
पण शब्द ही आम्हाला पुरत नाहीत. .....
.


Wednesday, September 29, 2010

my sketches


या जगात जगावे तरी कसे

मन मोकडे पनाने वावाराले तर म्हणतात,
पोरीला घरबंधन नाही!
शांत धीरगंभीर पाने वावाराली की म्हणतात,
आमोरासमोर बोलण्याची हिम्मत नाही !!

लग्न लवकर केले असेल तर म्हणतात,
एखादे लफड़े लापवायाचे असेल !!!
लग्न उशिरा होत असेल तर म्हणतात,
मुलिताच काहीतरी खोट आहे.

खुपच शिकलेली असेल तर म्हणतात,
डोक्यावर मिरे वाटेल !
शिक्षण कमी घेतले असेल तर म्हणतात,
मुलगी मागास्लेली असेल!

मित्र मंडली असेल तर म्हणतात,
मुलगी वाया गेलेली असेल.
मित्र मंडली कमी असेल तर म्हणतात,
मुलगी एकलकोंदी असेल.

या आशा दोन्ही बाजूने लोक बोलातात तर ,
माणसाने या जगात जगावे तरी कसे
व् निरपराध असतान्हा सुधा मरावे तरी कसे
.



मनाला एकदा आसेच विचारले

मनाला एकदा आसेच विचारले
का इतका तिच्यात गुंततो ?
नाही ना ती आपल्यासाठी
मग का तिच्यासाठी झुरतो ?

कळत नाही तुला
त्रास मला भोगावा लागतो
आश्रूं मधे भिजून भिजून
रात्र मी जागतो.

मी म्हटले मनाला
का स्वप्नात रमतो ?
तिच्या सुखा साठी तू
का असा दुखात राहतो ?

मन म्हणाले
प्रेम तेव्हा सुरू होते जेव्हा
आपण स्वता ला विसरतो
सार काही तिच्यासाठी
ईतकेच मनाला समजावतो
.



Saturday, August 7, 2010

माझं मन हे असं का ?

सगळ्यांनी समजावलं तरी मानत नाही
कितीही वाटलं तरी करवत नाही
कुणी काही सांगितल तर एकवत नाही
अश्रु कितीही गाळले तरी गळतच नाही
माझं मन हे असं का ? कुणालाच कळत नाही .
चटके कितीही बसले तरी ओरडत नाही
आपल्यानीच तोडल तरी दुरावायला तयार नाही
अपेक्षेप्रमाणे सगळ्यांना एकत्र आणता येत नाही.
माझं मन हे असं का ? कुणालाच उमजत नाही .
निस्वार्थी कष्टाची जाणीवही कुणा नाही
निखळ प्रेमाच्या भावनेचा आदरही कुणा नाही
कितिही केलं तरी केलं कुणी म्हणतच नाही
वाटतं मी कुणाची कुणी राहिलेच नाही
कारण कुणी मला प्रेमाने आपलं म्हणतच नाही
माझं मन हे असं का ? कुणालाच समजत नाही .

Wednesday, August 4, 2010

!!आळशी माणसं खुप हुशार असतात!!


"आळशी माणसं खुप हुशार असतात". माझ्या या वाक्यावर आईची प्रतिक्रिया ठरलेली आहे. "बरं बाई.तुमचा रेडा गाभणा. देतो, चांगलं दहा शेर दुध देतो." आळशीपणा आणि हुशारी यांचं समीकरण जरीआईला पटलं नसलं तरी माझा यावर ठाम विश्वास आहे. माझ्या अनेक [आळशी] आप्तेष्टांचा या मताला सुप्त पाठींबा आहे हे मला ठाऊक आहे.

आळशी माणसं कधीही कौटन किंवा रंग जाणारे कपडे विकत घेत नाहीत. सिंन्थेटिक, म़ळखाऊ रंगाचे, मशिन वाश/ बाई वाश असेच कपडे घेतात. रिंकल फ्री कापड हा त्यांचा आवडता प्रकार. १-१ कपडा वेगळा धुणार कोण आणि कौटनच्या कपडयाला इस्त्री करणार कोण? एवढा सगळा विचार कपडे घेताना करावा लागतो आणि त्यासाठी चणाक्ष बुध्दी लागते. रात्री झोपायच्या आधी दिवा बंद करायलाउठायचं नसेल तर जवळ स्वीच घेण्याची व्यवस्था घराचं वायरिंग चालु असतानाच करुन घ्यावी लागते. इतक्या बारीक-सारीक गोष्टी लक्षात ठेवुन करणं हे काही येरागबाळ्याचं काम नाही. म्हणजे नंतर नुसता हार घातला की काम झालं.

ही माणसं जेवतात अगदी सावकाश. यांच जेवण होइपर्यंत ताटं उचलुन झालेली असतात, उरलं सुरलं काढुन ठेवलेलं असतं. अगदी पुसुन घ्यायची वेळ झाली तर ताट हातात घेऊन जेवत बसतात. नंतर यांना काही काम पडत नाही. हे लोक बहुदा भात खात नाहीत. भाता आधीचं जेवण होईपर्यंत एतकाचेंगटपणा करतात की भाताची आणि झोपेची वेळ एकच येते. बरं भात खाल्ला नाही म्हणजे जाडी वाढत नाही आणि जाडी वाढली नाही म्हणजे व्यायाम करावा लागत नाही. चहा गाळल्यावर चोथा हातांनीकधी काढत नाहीत, त्यात पाणी घालुन परत गाळतात आणि तेच डस्ट-बीन वर आदळतात. देवालाही सोडत नाहीत. पुजेला बसताना पंचपात्रात पाणी घ्यायला नको म्हणुन सरळ देवाला नळाखाली धरतात. चेष्टा नाही - प्रत्यक्ष पाहिलं आहे.

हे लोक पब्लिकमध्ये मात्र प्रिय असतात. कधीही फारशी कटकट करत नाहीत. महिनोंमहिने यांचं पासबुक अपडेटेड नसतं. ते असावं असा त्यांचा हट्टही नसतो. बँकेत गेले आणि प्रिंटर बंद असेल तर सरळ बाहेर येतात. वाट बघत किंवा हुज्जत घालत बसत नाहीत. भाजी घेताना कोणती भाजी केवढ्याला बगैरे विचारत बसत नाहीत. सगळं घेऊन झालं की एकदमच कीती झाले ते विचारतात. जणु काही त्यांनीच आपल्याला गणित शिकवलंआहे अशा थाटात मान डोलवत पैसे देऊन मोकळे होतात. तो सुट्टे नाहीत म्हणाला तर उरलेले पैसे त्याला दान करतात. आपले पाकिट उलथं-पालथं करुन सुट्टे शोधायच्या किंवा शेजारच्या दुकानातुन सुट्टे करुन घ्यायच्याभानगडीत पडत नाहीत. त्यामुळे भाजीवाले, रिक्षावाले इ. लोक यांच्यावर सदैव खुष असतात. अशा लोकांमुळेचतर रिक्षा, टॅक्षी चालु आहेत.

ही शोधाची जननी आहे" आळशी लोक काम बाकी छान करुन घेतात. उंटावरुन शेळ्य हाकायची सवय असते ना. आपलं काम समोरच्याकडुन कसे करुन घ्यावं हे त्यांना बरोबर कळते. आळशीपणा हा एक गुण "मॅनेजर" म्हणवुन घेणा-या प्राण्याकडे असणं आवश्यक आहे असं मला मनापासुन वाटतं. अति उत्साही मॅनेजर प्रत्येक-न-प्रत्येक गोष्टीत नाक खुपसत बसतो. आपलं काम तर वाढवतोच पण हाताखालच्या लोकांना फार इरीटेट करतो. खरंतर माणुस आळशी आहे म्हणुनच तो उत्क्रांत झाला. दुनिया ज्यांची सारखी उदाहरणे देत असते त्या मुंग्या, मधमाशा किंवा कोळ्यासारखं काम करत बसला असता तर त्यांचासरखाच राहिला असता. माझ्या मते, "गरज ही शोधाची जननी आहे" असं म्हणण्यापेक्षा "आळस ही शोधाची जननी आहे" असं म्हटलं पाहिजे.

पायावर चालत राहिला असता तर वाहनं तयार झालीच नसती. सगळे निरोप प्रत्यक्ष जाऊन सांगायचे ठरवले असते तर पोस्ट, टेलिग्राम, ई-मेल या गोष्टी अस्तित्वात आल्याच नसत्या. रीमोट कंट्रोल, कौर्डलेस फोन यांची गरज किती होती बघा आणि त्यामागे आळस किती होता ते बघा.... आणि आता तुम्हींच सांगा - आळशीपणा आणि हुशारी यांच नातं आहे की नाही?