Sunday, March 14, 2010

'आनंद 'जगा.....

'आनंद 'जगा.....
आनंद स्वाभाविक आहे, आनंदसाठी कोणताच प्रश्न नाही, दुःख अस्वाभाविक आहे, दुःखाचा अर्थच हां आहे की जे नको व्हायला हवे होते, सुखाचा अर्थ हां आहे की जे व्हायला हवे होते , सुखाचा अर्थ हा असा आहे की ज्याला आपण विना कारण स्वीकार करतो, आणि दुःखाचा अर्थ हां असा आहे की ज्याला आपण कारणासहीत ही स्वीकार करू शकत नाही, मग त्यासाठी आपल्याला कारणाचा शोध घ्यावा लागतो, कारण त्याला शोधल्याशिवाय मिटवू शकत नाही, ज्याला मिटवायाचे असते त्याचे कारण शोधावे लगते, ज्याला मिटवायाचे नसते त्याचे कारण शोधावे लगत नाही , त्याला आपण जगत असतो....... म्हणुनच आनंद जगा...